पाचोरा नगरपालिका भाजपाच्या गटनेते पदी सुरज संजय वाघ यांची सर्वानुमतते निवड करण्यात आली असल्याची माहिती आज दिनांक 29 डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता प्रसिद्ध माध्यमाद्वारे देण्यात आली. माजी आमदार दिलीप वाघ, भाजपा नेते अमोल शिंदे, भाजपा नेत्या वैशालीताई सूर्यवंशी व संजय वाघ व नवनिर्वाचित नगरसेवक व भाजपा पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही निवड करण्यात आली, त्यानंतर सुरज वाघ यांचा सत्कार करत सर्वांकडून अभिनंदनही करण्यात आले,