जलालखेडा पोलीस स्टेशनमध्ये एका गंभीर प्रकरणात सहाय्यक फौजदार पुरुषोत्तम देविदास धोंडे यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. चोरीच्या संशयावरून काही अल्पवयीन मुलांना पोलीस स्टेशनमध्ये आणून त्यांना बेदम मारहाण केल्याची तक्रार गंगाधर महादेवराव सरदार यांनी दाखल केली होती.या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी सहाय्यक फौजदार धोंडे यांच्यावर भारतीय न्याय संहिता, बाल न्याय अधिनियम आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.