वर्धा: सरकारी कार्यालयाची ओळख: पक्ष्यांचं हक्काचं घर: तहसील कार्यालय हिंगणघाट
Wardha, Wardha | Sep 15, 2025 वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तहसील कार्यालय एक सरकारी इमारत असली तरी, आता ते हजारो पाणपक्ष्यांचं हक्काचं घर बनलं आहे. निसर्गसाथी फाउंडेशनने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणानुसार, तहसील आणि पंचायत समितीच्या आवारात 158 घरटी आढळली आहेत. ही घरटी गाय बगळा, छोटा बगळा, छोटा पानकावळा आणि रात ढोकरी यांसारख्या चार वेगवेगळ्या प्रजातींच्या पक्ष्यांनी 39 झाडांवर बांधली असल्याचे 15 सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात कळविले आहे