कोपरगाव: नगर मनमाड महामार्गावर जीवघेण्या खड्ड्यामुळे तरुणाचा मृत्यू , येवला नाका येथे संतप्त नागरिकांचा रास्ता रोको
कोपरगाव शहरातील येवला नाका परिसरात मंगळवार दिनांक 28 ऑक्टोबर 2025 रोजी पुन्हा एकदा रस्त्यावरील खड्ड्याने जीव घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मंगळवारी रात्री सुमारे 10.30 वाजेच्या सुमारास मोटरसायकल घसरल्याने मागून येणाऱ्या ट्रकने एका युवकाला चिरडले. यात युवकाचा जागीच मृत्यू झाला.या घटनेमुळे संतप्त नागरिकांनी आज बुधवार दिनांक 29 ऑक्टोबर 2025 रोजी नगर–मनमाड महामार्गावरील येवला नाका येथे रास्ता रोको आंदोलन सुरु केले.