चाळीसगाव: धुळे-संभाजीनगर महामार्गावर दुचाकीचा अपघात, 'नरेंद्राचार्य महाराज संस्थान'च्या टीमकडून तातडीने मदत
चाळीसगाव: धुळे-संभाजीनगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११ वर भोरस फाट्याजवळ शुक्रवारी (१ नोव्हेंबर २०२५) रात्री ८ वाजून २० मिनिटांनी कुत्रे आडवे आल्याने एका दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात १८ आणि १९ वर्षांचे दोन तरुण गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच जगतगुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज संस्थान, नानिज्धाम, खडकी बायपास येथील २४ तास विनामूल्य सेवा देणारी टीम तातडीने घटनास्थळी पोहोचली आणि जखमींना उपचारासाठी चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.