जालना: जालना महापालिकेच्या वतीने मोची गल्लीतील मटन शॉपवर जप्तीची कारवाई; कारवाईनंतर तक्रारदाराला धमक्या दिल्याचा आरोप
Jalna, Jalna | Nov 2, 2025 जालना महानगरपालिकेच्या वतीने रविवार दि. 2 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास मोची गल्ली येथील शक्ती बकरा आणि चिकन मटन शॉपवर जप्तीची कारवाई करण्यात आली. जिल्हाधिकारी तथा आयुक्त आशिमा मित्तल यांच्या आदेशान्वये ही कारवाई करण्यात आली असून स्वच्छता प्रमुख सॅमसंन कसबे, जुना जालना एस आय रवींद्र कल्याणी, शोएब खान, एस आय संतोष पाटोळे, संतोष धोत्रे तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते. पुढील कार्यवाही सुरु असतानाच या प्रकरणामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.