देसाईगंज वडसा: आमदार रामदास मसराम यांच्या अध्यक्षतेखाली एक जून रोजी सिंधी भवन येथे विविध प्रश्नावर आढावा बैठक
आमदार रामदास मसराम यांच्या अध्यक्षतेखाली एक जून रोजी देसाईगंज येथील सिंधी भवन येथे कृषी पंप प्रलंबित वीज कनेक्शन शेतकऱ्यांसाठी आढावा बैठकीचे आयोजन केले असल्याची माहिती 31 मे रोजी दुपारी एक वाजता देण्यात आली तरी या बैठकीला अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन तालुका काँग्रेस कमिटी तर्फे केले आहे.