कळमनूरी: सोडेगाव शिवारात भरधाव कारची दोन दुचाकीला धडक देत झाली पलटी,प्रवासी बालंबाल बचावले
बोल्डा फाटा ते उमरा या राज्य रस्त्यावर कार क्रमांक MH 38 AD 1324 च्या चालकाने आज दि.7 नोव्हेंबर रोजी दुपारी 2-30 वाजताच्या सुमारास आपली कार भरधाव वेगात चालवन सोडेगाव शिवारात आल्यानंतर तेथील वळणावर रस्त्यावर उभ्या असलेल्या दोन दुचालीला जोराची धडक देत कार रस्त्याच्या बाजूला नाल्यात जाऊन पलटी झाली आहे यासोबत दोन दुचाकी धडक लागल्याने त्या देखील नाल्यात जाऊन पडले आहेत,कार पलटी होऊन देखील यातील चालक मात्र बालंबाल बचावला,शिवाय दुचाकी जवळ कोणी उभे नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे .