सडक अर्जुनी येथील गिऱ्हेपुंजे इंग्लिश पब्लिक स्कूल व न्यू डेझी इंग्लिश प्रायमरी स्कूल यांच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी माजी मंत्री सामाजिक न्याय व विशेष सहाय्य महाराष्ट्र राज्य तथा आमदार राजकुमार बडोले यांनी उपस्थित राहून विद्यार्थी व पालकांशी संवाद साधला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन दिले. शिक्षणाच्या महत्वावर प्रकाश टाकताना, सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले.