खानापूर विटा: खानापूरात अज्ञात चारचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी, चारचाकीचा चालक फरार
खानापूर शहरातील भगतमळा शेजारील राष्ट्रीय महामार्गावरील पुलाजवळ बुधवारी रात्री पावणे सातच्या सुमारास अज्ञात चारचाकी व दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात जीवितहानी टळली असली तरी दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. अपघातानंतर चारचाकी वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाला.मिळालेल्या माहितीनुसार,दुचाकी पल्सर वरून बिरुदेव भाऊसो मंडले (वय 23, रा. हिवतड) हे विट्याहून खानापूरच्या दिशेने येत होते. त्याचवेळी अज्ञात चारचाकी वाहन देखील विट्याहून खानापूरला येत होते दोन्ही वाहनात भीषण अपघात झाला असला तरी मात्