लाखांदूर: शहरातील स्टेट बँक समोर अज्ञात वाहनाच्या धडकेत एक इसम गंभीर जखमी
शहरातील भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया च्या शाखेतून पैसे काढून बस स्टॉप कडे पायी जात असताना अचानक अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली या अपघातात एक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली ही घटना तारीख 13 ऑक्टोबर रोजी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास लाखांदूर वर्षा राष्ट्रीय महामार्गावरील स्टेट बँक शाखेच्या समोर घडली या घटनेची नोंद लाखांदूर पोलिसांनी घेतली आहे तर यात बाबुराव लक्ष्मण खरकाटे वय 55 राहणार गौराळा असे जखमी असलेल्या इसमाचे नाव आहे