आर्णी नगर परिषदेत स्वीकृत नगरसेवक पदासाठी राजकीय हालचालींना वेग आला असून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये उमेदवारीसाठी जोरदार चुरस पाहायला मिळत आहे. या पदासाठी काँग्रेसकडून एकूण चार इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये डॉ. नाहिद अरीज बेग, रवींद्र बालाजी नालमवार, संजय उर्फ छोटू देशमुख आणि दीपक देवतळे यांचा समावेश आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून सहा इच्छुक उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले असून त्यात संदीप बाबुलाल पवार, अश्वजीत वसंतराव गायकवाड, बै