छत्रपती संभाजीनगर: भरधाव जाणाऱ्या कारने मोंढा नाका उड्डाणपुलावरून जाणाऱ्या सिटर रिक्षाला जोरदार धडक दिल्याने एका २२ वर्षीय तरुणासह ५ वर्षीय चिमुरडी ठार झाली. ही कार रिक्षावर एवढ्या जोरात धडकली की, रिक्षातून उडून तरुण उड्डाणपुलावरून खाली जालना रोडवर पडून जागीच ठार झाला. यात अन्य चार जणही जखमी झाले. हा अपघात शनिवारी मध्यरात्री १२:०० वाजेच्या सुमारास घडला.