अक्कलकोट: एसटी स्टॅन्ड परिसरात पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने हल्ला, तरुण गंभीर जखमी...
अक्कलकोट शहरातील एसटी स्टॅन्ड परिसरात बुधवारी सकाळी साडेअकरा वाजता पूर्ववैमनस्यातून एका तरुणावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली. जखमी तरुणाचे नाव विजयकुमार दिलीप शिंदे (वय २०, रा. मोरे वस्ती, ता. अक्कलकोट) असे असून, त्याच्यावर अक्षय माने, आकाश माने व त्यांच्या चार साथीदारांनी हल्ला केल्याचे समजते. यापूर्वी विजयकुमार आणि आरोपी यांच्यात तक्रार झाली होती. त्याच वैमनस्यातून बुधवारी विजयकुमार एसटी स्टॅन्ड येथे असताना आरोपींनी त्याच्यावर लाथाबुक्क्या व रॉडने मारहाण केली.