कोपरगाव: कोपरगावमध्ये नगरपरिषद व ग्रामीण रुग्णालयाच्या डास निर्मूलन जनजागृती अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
कोपरगाव नगरपरिषद व ग्रामीण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज 9 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता शहरात डास निर्मूलन जनजागृती अभियान राबविण्यात आले. या अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून शहरवासीयांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे.अभियानादरम्यान नगरपरिषद तसेच ग्रामीण विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी शहरातील विविध भागांमध्ये जाऊन डास निर्मूलनाची फवारणी केली. तसेच नागरिकांना स्वच्छता राखण्याचे आवाहन केले.