कोपरगाव: 39 वर्षाची परंपरा जपत सोनेवाडीतील भाविक नवरात्रात देवी दर्शनाला रवाना
कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथील भाविकांनी तब्बल 39 वर्षाची परंपरा आजही जपली असून नवरात्रात देवी दर्शन करण्यासाठी आज २२ सप्टेंबर रोजी प्रस्थान झाले आहे. माजी सरपंच पांडुरंग जावळे यांच्या हस्ते नारळ फोडत भाविकांना शुभेच्छा देण्यात आल्या. देवी दर्शनासाठी सोमनाथ जावळे, धर्मा जावळे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक सी जी जगताप, कांतीलाल जावळे, विनायक चव्हाण, धोंडीराम जावळे, कर्नासाहेब जावळे, पंडित जावळे, लक्ष्मण जावळे , संजय सुपेकर यांनी ग्रामदेवतेचे दर्शन घेऊन प्रस्थान केले.