धुळे: ब्राह्मण मंडळाचा प्रेरणादायी उपक्रम; आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते धुळे सैनिक भवनात गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
Dhule, Dhule | Nov 9, 2025 श्री शुक्ल यजुर्वेदी गोवर्धन ब्राह्मण मंडळाच्या वतीने सैनिक भवन येथे आमदार अनुप अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली प्रेरणादायी गुणगौरव सोहळा उत्साहात पार पडला. शैक्षणिक, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवणारा हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरला असून, आमदार अग्रवाल यांनी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.