भिवंडी परिसराच्या काल्हेर गाव येथे राजलक्ष्मी कॉम्प्लेक्स येथे असलेल्या एका कपड्याच्या गोडाऊनमध्ये भीषण आग लागल्याची घटना रात्री घडली होती. आगीची माहिती मिळताच भिवंडी,ठाणे,उल्हासनगर,नवी मुंबई आणि कल्याण डोंबिवली अग्निशमन दलाचे जवान अग्निशमन इंजिन,वॉटर टँकर घटनास्थळी दाखल झाले होते आणि तब्बल दहा तास प्रयत्न केल्यानंतर सकाळच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. मात्र तोपर्यंत गोडाऊन जळून खाक झाले असून लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती मिळत आहे. सुदैवाने जीवित हानी झाली