महाबळेश्वर: महाबळेश्वर येथील बोटमन कम मजूर यांचे सुरू असलेले साखळी उपोषण पालकमंत्री व पुनर्वसन मंत्री यांच्या आश्वासनानंतर स्थगित
महाबळेश्वर येथील ५३ बोटमन कम मजूर यांचे सुरू असलेले साखळी उपोषण स्थगित काण्यात आले आहे. मंत्री मकरंद पाटील व मंत्री शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन देत कामावर परत रुजू होण्याचे निर्देश देण्यात आल्यानंतर बोटमन कामगारांचे हे उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे, परंतु हा लढा चालू ठेवणार असून, दिलेली आश्वासने पूर्ण न झाल्यास अजुन तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेकडून आज मंगळवार दिनांक 23 सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता दिला आहे.