भंडारा: मित्राचा वाढदिवसातून परतताना काळाचा घाला; दुचाकी चालकाचा मृत्यू! अड्याळ येथील सहाय्यता नगर येथील घटना
मित्राचा वाढदिवस साजरा करुन परत येत असताना एका ३० वर्षीय तरुणाचा दुचाकी अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली. अविनाश घनश्याम जिभकाटे रा. कोंढा असे मृताचे नाव आहे. ही घटना शनिवारी २० सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास सहायता नगर (अड्याळ) येथे घडली. मित्राच्या वाढदिवस साजरा करण्यासाठी पाच मित्र कारने रावणवाडी येथे गेले होते. तेथून परत येत असताना अविनाश मात्र दुचाकीने परत येत होता. अविनाश स्वतः दुचाकीने स्वगावी निघाला.