अलिबाग: महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या योजनांचे कर्ज प्रस्ताव महादिशा पोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने सादर करावेत
Alibag, Raigad | Nov 28, 2025 महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, जिल्हा कार्यालय रायगड मार्फत सन 2025-26 या अर्थिक वर्षाकरिता पात्र लाभार्थ्याकडून महामंडळ राबवीत असलेल्या विविध योजनांसाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत असून इच्छुक व पात्र लाभार्थ्यांनी या संधीचा लाभ घेऊन ऑनलाईन अर्ज भरावेत, असे आवाहन महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाकडून करण्यात आले आहे. अनुसूचित जाती व नवबौध्द लोकांच्या स्वयंरोजगारासाठी अर्थिक सहाय्य व सामाजिक उन्नतीच्या उद्देशाने त्यांच्या सर्वांगीन विकासासाठी हे महामंडळ राबवित असलेल्या योजनांची अंमलबजावणी होण्यासाठी भारत शासनाच्या प्रधानमंत्री अनुसूचित जाती अभ्युदय योजने अंतर्गत या योजनांद्वारे लाभार्थ्यांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणे, अर्थिक सक्षमीकरण घडवणारी आणि जीवनमान उंचावणे हा प्रमुख उद्देश या महामंडळाचा आहे.