अंबरनाथ: बदलापूर मध्ये फक्त शिवसेना,शिवसेना आणि शिवसेनेचा आवाज घुमणार: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सभेतील वक्तव्य व्हायरल
निवडणुकीचे वारे सर्वत्र वाहत आहेत,त्यामुळे सर्व ठिकाणी वेगवेगळ्या पक्षांकडून आपला प्रचार शक्ती प्रदर्शन करत केला जात आहे.तसेच वेगवेगळ्या सभा देखील घेतल्या जात आहेत. बदलापूर मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील मोठी सभा घेतली. बदलापूर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. बदलापूर मध्ये फक्त शिवसेना,शिवसेना आणि शिवसेनेचाच आवाज घुमणार असे वक्तव्य सभेदरम्यान केले असून त्यांचे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे .