नेर: माणिकवाडा येथील यात्रेतून एका महिलेची सोन्याची पोत लंपास,नेर पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल
Ner, Yavatmal | Nov 8, 2025 फिर्यादी श्रीमती मंदा विजय शहाळे यांच्या तक्रारीनुसार सहा नोव्हेंबरला रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास माणिकवाडा येथे यात्रेमध्ये गेली असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेऊन फिर्यादीच्या गळ्यामध्ये असलेली वीस हजार रुपये किमतीची पाच ग्रॅम वजनाची सोन्याची पोत चोरून नेली. याप्रकरणी 7 नोव्हेंबरला दुपारी अंदाजे दोन वाजताच्या सुमारास नेर पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.