मुर्तीजापूर: जुनी वस्ती परिसरातील हलवाईपुरा येथे २२ वर्षिय ऑटो चालकाला मारहाण,आरोपी विरुद्ध शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल
शेख तौफिक शेख आसिफ वय २२ वर्षे राहणार रहमत नगर जुनी वस्ती यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार फिर्यादी हा बुधवार २४ सप्टेंबर रोजी सकाळी पाच वाजता पूर्वी आपला ऑटो घेऊन घरी जात असताना आरोपी अब्दुल जाफर अब्दुल हन्नान वय २५ वर्षे राहणार हलवाईपुरा याने ऑटोला जबरदस्ती थांबवून घरी सोडण्यास लावले असता फिर्यादीने भाड्याचे पैसे मागितले तर आरोपीने अक्ष्लील शीवीगाळ करीत लाकडी दांड्याने मारहाण केली दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विरुद्ध शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू आहे.