हिंगणघाट: शहरातील वणा नदी परीसरात स्मशानभूमी जवळ पोलिसांची दारु वाहतूक करणाऱ्या विरोधात कारवाई
हिंगणघाट शहरातील वणा नदी परीसरातील स्मशानभूमी जवळ पोलिसांनी अवैध गावठी मोहा दारु वाहतूक करणाऱ्या विरोधात कारवाई करीत ५२ हजार २०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.प्राप्त माहितीनुसार हिंगणघाटकडे दुचाकीने गावठी मोहा दारु वाहतूक करीत असल्याची माहिती मिळताच पोलीसांनी वणा नदी परीसरात स्मशानभूमीत परीसरात नाकाबंदी करीत दुचाकी क्रमांक .एम.एच 32 ए .यु.5025 ला अडवून पाहणी केली असता दुचाकीवर गावठी मोहा दारुसाठा आढळून आला.