तळा: तळा बाजारपेठेत प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्या ठेवणाऱ्यांवर नगरपंचायत प्रशासनाची कारवाई, ६ किलो प्लास्टिक जप्त
Tala, Raigad | Apr 12, 2024 तळा बाजारपेठेमध्ये प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्या ठेवणाऱ्यांवर तळा नगरपंचायत प्रशासनाने शुक्रवारी दुपारी कारवाई केली. यावेळी दुकानदारांकडून ६ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. यावेळी नगरपंचायतीचे स्वच्छता निरीक्षक दीपक वडके, कनिष्ठ लिपिक धनेश केतकर तसेच नगरपंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते.