आमगाव: पोलिस ठाणे, आमगाव येथे पोलिस कर्मचाऱ्यांनी उत्साहाने केले रक्तदान
Amgaon, Gondia | Nov 7, 2025 सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत पोलिस ठाणे, आमगाव येथे आज रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात महिला व पुरुष पोलिस कर्मचाऱ्यांनी उत्साहाने सहभाग घेत रक्तदान केले.रक्तदान ही सर्वोत्तम मानवसेवा आहे या भावनेतून सर्वांनी सहभाग घेतला. या शिबिराचे आयोजन आमगाव पोलिस ठाण्याच्या वतीने करण्यात आले होते. शिबिरात अनेक पोलिस अधिकारी, कर्मचारी तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते.