शिरपूर: शहरातील संस्थेची व कर्मचाऱ्यांची बदनामी,जाब विचारल्याने आमोदे येथे कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व जीव मारण्याची धमकी
Shirpur, Dhule | Nov 6, 2025 शिरपूर शहरातील Bullet Healthcare Services या आरोग्यसेवा संस्थेची व तेथील कर्मचाऱ्यांची गावात बदनामी केल्याच्या केल्याप्रकरणी जाब विचारल्यावरून झालेल्या वादातून महेश अनिल बारी रा. वाल्मीक नगर,शिरपूर याने संस्थेच्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करीत जीव मारण्याची धमकी दिल्याची घटना 6 नोव्हेंबर आमोदे येथे घडली.या प्रकरणी Bullet Healthcare Servicesचे विकास देवीदास माळी रा.फुलेनगर,शिरपूर यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.तपास पोहकॉ कुंदन पवार करीत आहे.