ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामविकास विभागाकडून राबविण्यात येत असलेल्या कामाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक दाद दिली. शुक्रवारी नागपूर येथे झालेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. सायंकाळी पावणे सात वाजता मंत्री जयकुमार गोरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, ग्रामविकास विभागाच्या विविध उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील विकासाचा वेग वाढत आहे.