हरीपुरा या गावात आदिवासी आश्रम शाळा आहे. या आश्रम शाळेमध्ये गुरुवारी सावखेडा सिम प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने सिकलसेल सप्ताह अंतर्गत जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना शिकलसेल आजारा संदर्भात सखोल अशी माहिती देण्यात आली व त्याच्या उपचार पद्धती संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.