आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर धुळे प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व शस्त्रपरवाना धारकांना शस्त्रे तात्काळ संबंधित पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्याचे सक्त आदेश दिले आहेत, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी शरद पवार यांनी दिली. शिरपूर, दोंडाईचा, पिंपळनेर आणि शिंदखेडा येथील निवडणुका शांततेत पार पडाव्यात म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. न्यायाधीश, बँक सुरक्षा कर्मचारी व नोंदणीकृत खासगी सुरक्षा रक्षकांना सूट असून, आवश्यक कारण असल्यास १५ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येईल.