खेड: चाकणमध्ये दंडाची पीडीएफ फाइल पाठवून आठ लाखांची फसवणूक
Khed, Pune | Sep 24, 2025 वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याने झालेल्या दंडाची पीडीएफ फाइल पाठवून मोबाइल हॅक करून एकाची आठ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना चाकणमध्ये उघडकीस आली. या प्रकरणी ४५ वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे.