मेहकर: राष्ट्रीय लोक कलावंत दिव्यांग निराधार संघर्ष समितीच्या तालुका सल्लागार पदी दे.माळी येथील गणेश तायडे यांची नियुक्ती
राष्ट्रीय लोककलावंत दिव्यांग निराधार संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य. या राज्यव्यापी संघर्ष समितीच्या मेहकर तालुका सल्लागार पदी गणेश तायडे यांची नियुक्ती राष्ट्रीय अध्यक्ष संदीपकुमार बोरकर यांचे आदेशानुसार व बुलढाणा जिल्हा अध्यक्ष सुनील पाटील गाडेकर यांचे मार्गदर्शनात महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष हरिभक्त परायण प्रकाश महाराज मगर यांचे हातून नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. त्यावेळी संघर्ष समितीचे सर्वच पदाधिकारी व राज्य कार्यकारणी आणि मोठ्या संख्येने लोककलावंत उपस्थित होते.