जालना: जालना शहरात कुत्र्यांचा उच्छाद,9 जणांना कुत्र्याचा चावा;एका चिमुकल्याला रिअॅक्शन;पालिका डोळेझाक करतेय?नागरिकांची नाराजी
Jalna, Jalna | Nov 5, 2025 जालना शहरात कुत्र्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे चित्र समोर येत आहे. या धोकादायक परिस्थितीकडे पालिकेने गांभीर्याने पाहिले नसल्याची नागरिकांचमधून नाराजी व्यक्त होत आहे. यापूर्वी शहरातील दुर्दैवी घटनेत दोन चिमुकल्यांचा मृत्यू कुत्र्यांच्या हल्ल्यात झाला होता. मात्र त्यानंतरही कोणतीही ठोस उपाययोजना पालिकेकडून राबविण्यात आली नसल्याचा आरोप नागरिक करत आहेत. बुधवार दि. 5 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार दिवसभरात सुमारे 9 जणांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे.