जालना: मोतीबाग तलावात तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ; पोलीसांनी मयताची ओळख पटविली; मृतदेह रुग्णालयात हलविला
Jalna, Jalna | Sep 14, 2025 जालना शहरातील मोतीबाग येथील तलावात रविवार, 14 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी सुमारे सहा वाजता एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. तलावाच्या पाण्यावर मृतदेह तरंगताना दिसल्याने स्थानिक नागरिकांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढला. या तरुणाची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले असून मृत व्यक्तीचे नाव धनंजय कचरुलाल लाटा (वय अंदाजे 35 वर्षे, रा. पोलीस गल्ली, जालना) असे आहे. तो आज सकाळपासून घरातून बेपत्ता होता, अशी माहिती कुटुंबीयांनी दिली.