वैजापूर: मा.आ.भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांची लोकसभा प्रमुख पदी नियुक्ती,मुंबई येथे खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिले नियुक्तीपत्र
माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांच्यावर शिवसेनेत मोठी जबाबदारी टाकणार असे विधान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात आले होते.दरम्यान जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका पूर्वी माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांच्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आदेशानुसार मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.चिकटगावकर यांची शिवसेना पक्षाच्या लोकसभा प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे.