आरमोरी: वैरागड येथे बाल युवा दुर्गा उत्सव मंडळ लोहार मोहल्ला वैरागड व संग्राम ग्रुप यांच्या वतीने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन
वैरागड येथे बाल युवा दुर्गा उत्सव मंडळ लोहार मोहल्ला वैरागड व संग्राम ग्रुप यांच्या वतीने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे आयोजन प्राथमिक आरोग्य केंद्र वैरागड यांच्या सहकार्याने व स्पर्श हॉस्पिटल ब्रह्मपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.या शिबिरात रक्तदाब तपासणी, मधुमेह तपासणी, हृदयविकार तपासणी व युवांसाठी विशेष मार्गदर्शन, तसेच स्त्रियांसाठी विशेष सल्ला आदी सेवा मोफत देण्यात आल्या.