राहुरी: टाकळीमिया येथील नागवडा वस्ती चारीही बाजूने पाण्याने वेढल्याने 32 नागरिक रेस्क्यू करत काढले बाहेर
शनिवारी रात्री ढग फुटी सदृश्य पाऊस झाल्याने टाकळीमिया येथील नागवडा परिसरामध्ये चारही बाजूने पाण्याने वेढल्याने एका वस्तीवरील 32 नागरिक या वस्तीमध्ये अडकले होते. आज रविवारी सकाळी शेतकरी सेनचे रवींद्र मोरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या रेस्कु करत 32 नागरिकांना सुखरूप पाण्यातून बाहेर काढले. त्यामध्ये महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक देखील होते त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे.