सार्वजनिक सेवेतील आरोग्य मंदिरे म्हणजे पवित्र आरोग्य सेवेच केंद्र.. शहापूर तालुक्यातील प्रा.आ.केंद्र टेम्भा येथे बुधवार, दि. 26 नोव्हेंबर 2025 रोजी घडलेलं दृश्य…हा दिवस साध्या गावातला साधा दिवस नव्हता. या केंद्रात गरोदर मतांसाठी डोहाळे जेवण व ओटी भरण्याचा अविस्मरणीय उत्सव नव संकल्पनेतून पार पडला... मातृत्वाला मान, पोषणाला दिशा आणि सुरक्षित प्रसूतीची खात्री — हे सगळं एकत्र येऊन उत्सवासारखं फुललं.