निफाड तालुक्यात धक्कादायक घटना : विहिरीत आढळला पती - पत्नीचा मृतदेह :- थेटाळे ता.निफाड येथे मध्यरात्रीच्या सुमारास विहिरीत तरुण पती - पत्नीचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत माजी पोलिस पाटील बाळकृष्ण पर्वत पवार यांनी लासलगाव पोलिस ठाण्यात खबर दिली की, दि.२९ डिसेंबर २०२५ रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास मयतांचे शेत गट क्रमांक ११४ मधील विहिरीत योगेश भाऊसाहेब शिंदे (वय ३५) व पत्नी सोनाली सोगेश शिंदे (वय ३२) हे दोघेही बुडालेल्या अवस्थेत आढळून आले आहेत