अमळनेर तालुक्यातील कळमसरे शिवारात शेतात येण्या-जाण्याच्या रस्त्याच्या किरकोळ कारणावरून एका महिलेला दोन जणांनी शिवीगाळ करत मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याची गंभीर घटना गुरुवारी ४ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेप्रकरणी सायंकाळी ७ वाजता मारवड पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.