वैजापूर: दारूच्या नशेत मनेगाव शाळेत गोंधळ; शिपायावर गुन्हा दाखल
मनेगाव येथील एका शाळेत शुक्रवारी सकाळी शाळेचा शिपाई आंबादास रामचंद्र सुर्यवंशी (वय ४०, रा. शिऊर, ता. वैजापूर) हा दारूच्या नशेत शाळेत येऊन शिक्षकांशी अरेरावी केल्याची घटना घडली. मुख्याध्यापक के. पी. भोये व शिक्षक व्ही. बी. पिंजारी, पी. व्ही. पाटील, पी. एम. जाधव यांनी पोलिसांना दिलेल्या लेखी तक्रारीत सुर्यवंशी हा शाळेच्या वेळेत नेहमीच दारूच्या नशेत येत असल्याचे नमूद केले आहे.