लाखनी: लाखनी पोलिसांची कारवाई : मटक्यावर छापा, एकावर गुन्हा दाखल
पोलीस ठाण्याच्या पथकाने मटका खेळावर छापा टाकत एकाला रंगेहात पकडले. या कारवाईत रोख रक्कम, सट्टापट्टीचे कागद व इतर साहित्य जप्त करण्यात आले असून आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. प्राप्त माहितीनुसार, लाखनी पोलीस स्टेशनमध्ये कलम 12(अ) महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार ही कारवाई करण्यात आली. गहेष यशवंत गंधे (वय 44 वर्षे, रा. वार्ड क्र. 8, लाखनी) असे आरोपीचे नाव आहे.