यवतमाळ: यवतमाळ शासकीय रुग्णालयात रुग्णांच्या आरोग्याशी खेळ ; गुरुदेव युवा संघाचा आरोप
यवतमाळ येथील श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील रुग्णांच्या आरोग्याशी उघडपणे खेळ केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रुग्णांना देण्यात येणाऱ्या बेडशीट्स, चादरी व कपडे हे कालबाह्य आणि मुदत संपलेल्या मशीनवर धुतले जात असल्याने स्वच्छते ऐवजी जंतूंचा प्रादुर्भाव होऊन गंभीर संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण झाला आहे. धुलाई केंद्र सध्या टीबी हॉस्पिटल परिसरात कार्यरत असून, तिथे घाणीचे साम्राज्य आणि निकृष्ट पाणी वापरले जात असल्याचे समोर आले आहे.