मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे रामटेक पोलिसांनी नगरधन, रामटेक येथे सुरू असलेल्या 52 तास पत्त्याचा जुगार अड्ड्यावर धाड मारत जुगार खेळणाऱ्या 9 आरोपींना ताब्यात घेतले असून घटनास्थळावरून 3 लाख 87 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई 13 जानेवारीला सायंकाळी करण्यात आल्याची माहिती रामटेक पोलिसांनी 14 जानेवारीला सायंकाळी सात वाजता च्या दरम्यान प्रसिद्ध पत्रकात दिली आहे. पोलीस स्टेशन रामटेक येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.