जळकोट: अतनुर गावाजवळील पुलाच्या कामामुळे वाहतूक पर्यायी मार्गाने वळविली
Jalkot, Latur | Aug 20, 2025 अतनुर गावाजवळील पुलाच्या कामामुळे वाहतूक पर्यायी मार्गाने वळविली : चाकूर- किणी यल्लादेवी-वाढोणा बु.-गव्हाण ते जिल्हा सरहद्द रा.मा. २६८ रस्त्यावर अतनुर गावाजवळ मोठ्या पुलाचे बांधकाम सुरु आहे. त्यामुळे नदीपात्रात तात्पुरता वळण रस्ता करण्यात आला आहे. मात्र, तिरू नदीवरील बॅरेजचे दरवाजे उघडल्यानंतर या रस्त्यावरील वाहतूक बंद पडू शकते. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक उदगीर-घोणसी-कोळनूर-अतनुर-गव्हाण आणि अतनुर-कोळनूर-जळकोट/उदगीर या मार्गावर वळविण्यात आली आहे.