बिटरगाव पोलीस स्टेशन आंतर्गत येत असलेल्य मुरली बांधाऱ्याच्या परिसरात आज सकाळी एका फारीत बांधलेल्या अवस्थेत एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह सापडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, हा हत्येचा प्रकार असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.