शिरपूर: बभळाज शिवारात थाळनेर पोलिसांची धडक कारवाई ३४ लाखांचा ९७२ किलो गांजा जप्त,६ जणांविरोधात गुन्हा,दोघे ताब्यात
Shirpur, Dhule | Sep 21, 2025 तालुक्यातील बभळाज गाव शिवारातील सोज्यापाडा परिसरात वनजमिनीवर उभारलेल्या गांजा शेतीवर थाळनेर पोलिसांनी २० सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मोठी कारवाई करत ३४ लाख २ हजार रुपये किंमतीची सुमारे ९७२ किलो वजनाची गांजा झाडे जप्त करून सहा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती प्रसार माध्यमांना दिली