लील्हारे प्रोडक्शन वडसा-भुवन कुमार प्रस्तुत 'शुक्राची चांदणी' अंतर्गत प्रसिद्ध नृत्यांगना सोनाली पाटील यांच्या बहारदार लावणीच्या कार्यक्रमाचे आयोजन भागडी येथे करण्यात आले आहे. नवयुवक नाट्य कला मंडळ, सावित्रीबाई फुले चौक, भागडी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाद्वारे भागडी येथे २० डिसेंबर रोजी भव्य मंडईचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी नृत्यांगना सोनाली पाटील यांनी केलेल्या आवाहनाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.