हिंगणघाट: शहरातील बाजार समितीमध्ये कापूस खरेदीचा शुभारंभ:७ हजार ९१ रुपये दर:पहिल्याच दिवशी ५३० वाहनांची आवक
हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कॉटन मार्केट यार्ड मध्ये २०२०/२६ हंगामाचा कापूस खरेदीचा शुभारंभ सभापती अँड सुधिरबाबु कोठारी व माजी आ. राजूभाऊ तिमांडे यांचे हस्ते करण्यात आला.यावेळी कापूस आणलेल्या प्रथम पाच शेतकऱ्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला. पहिल्याच दिवशी कापसाची आवक कापूस मार्केट यार्ड येथे 530 वाहनाची झाली असून कापसाला 7091/-रुपये प्रति क्विंटल दर देण्यात आला कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.